स्वित्झरलॅंड हा 60 ते 70 लाख लोकसंख्येचा देश आहे. म्हणजेच आपल्या इकडच्या दोन मोठ्या जिल्ह्यांएवढी त्याची वस्ती आहे. येथील निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे. बाराही महिने येथे बर्फ व थोडा थोडा पाऊस पडत असतो. त्यामुळे आम्हास तेथे अगदी हिरव्याकंच निसर्गाचे दर्शन करावयास मिळाले.
साधारणतः काळ्या पैशाचा एकच प्रकार आतापर्यंत आम्हाला माहीत होता. ज्यावर आयकर न भरता म्हणजेच जो वहीखात्यात न दाखविता स्वतःजवळ बाळगला अशा पैशाला काळा पैसा असे म्हणतात. एवढेच सामान्य व्यक्तीस आजपर्यंत माहीत होते.
हा काळा पैसाही भारतात म्हणजेच "भारतीय काळा पैसा' हासुद्धा भरपूर प्रमाणात भारतात आहे. अर्थ व करतज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, जेवढा पांढरा पैसा तेवढाच काळा पैसासुद्धा भारतात आहे. यालाच "समांतर अर्थव्यवस्था' असेसुद्धा म्हटले जाते. म्हणजेच काळा पैसा हा योजनांच्या कामास येत नाही तसेच विविध प्रकारच्या थकबाक्या भरपूर प्रमाणात आहेत. याशिवाय पगार व व्याजावरही आमच्या सरकारचा भरपूर खर्च होत असतो. शिवाय लाललुचपतखोरी हा वेगळा आर्थिक शत्रूही आहेच.
विविध नागरी व्यवस्था व देशाला प्रगतीकडे नेणाऱ्या योजना यासाठी लागणाऱ्या पैशाला वरील प्रकारचे अनेक शत्रू आज भारतात आहेत. म्हणूनच अर्धा भारत दारिद्र्यरेषेच्या खाली असून, बाकीच्यांना अतिशय तोटक्या अशा नागरी सेवा मिळत आहेत.
भारतातील विकास योजनांसाठी लागणाऱ्या पैशाला किती शत्रू आहेत, याचे विवेचन आपण पाहिले. आता काळ्या पैशाचा हा नवीन प्रकार काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू या.
स्वित्झरलॅंड हा 60 ते 70 लाख लोकसंख्येचा देश आहे. म्हणजेच आपल्या इकडच्या दोन मोठ्या जिल्ह्यांएवढी त्याची वस्ती आहे. येथील निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे. बाराही महिने येथे बर्फ व थोडा थोडा पाऊस पडत असतो. त्यामुळे आम्हास तेथे अगदी हिरव्याकंच निसर्गाचे दर्शन करावयास मिळाले. आल्पस् पर्वताच्या अनेक पर्वतरांगा येथे असून, पिलातुस हा मुख्य डोंगर आहे. संपूर्ण स्वित्झरलॅंड पाहण्यासाठी रोप-वेची व्यवस्था तेथील पर्यटन विभागाने केली आहे. अगदी दोन व्यक्तींचा रोप-वे तसेच 25 ते 30 व्यक्ती बसू शकतील असा बससदृश रोप-वे येथे आहे. या डोंगरावरून त्या डोंगरावर रोप-वेने जाताना हजार फुटांपेक्षाही खोल दरीवरून हा रोप-वे काढलेला आहे व त्यात "डार्क ग्रीन' अशी हिरवळ रोप-वेमधून ओलांडताना स्वर्गसुखाची अनुभूती होते.
आम्ही गणपती, गौरीच्या वेळेस वेगवेगळे देखावे तयार करत असतो. जसे की- छोटेसे तळे, त्याच्या आजूबाजूला जंगल व मध्ये छोटेमोठे रस्ते, लहान लहान घरे.
सरोवराच्या मध्य भागात हॉटेल्स व रेस्टॉरंट्स. आपणास हवी असलेली अगदी ताजी मासळी तळ्यातून काढून लगेच आपल्यासमोर नास्त्यासाठी ठेवली जाण्याची व्यवस्था येथील हॉटेल्समध्ये आहे. निसर्गरम्यतेच्या बाबतीत काश्मीर, केरळ व स्वित्झरलॅंड अशी अनेक स्थळे असली, तरी त्यात प्रथम नामांकन याच देशाला द्यावे लागेल. त्याचे आणखी एक कारण असे की, यात्रेकरूंची अतिशय चांगली व कमीत कमी पैशात उत्तम व्यवस्था, हे येथील टूरिझमचे वैशिष्ट्य आहे.
निरनिराळ्या मेकॅनिकल वस्तू तयार करून जगभराच्या बाजारात येथून पाठविल्या जातात, पण आताशा कॉर्डस् (बॅटरीवर चालणाऱ्या) वस्तू निघाल्यामुळे या किल्ली देऊन मेकॅनिकल चालणाऱ्या वस्तूंचे चलन थोडे मागे पडले आहे. तरीही ही बाजारपेठ भरपूर विदेशी चलन या देशाला मिळवून देत असते.
दुसरे उत्पन्नाचे साधन म्हणजे पर्यटन (टूरिझम). संपूर्ण जगातून येथे प्रवासी येत असतात व या देशाला भरपूर विदेशी चलन मिळवून देत असतात.
या माध्यमानेही या देशाला भरपूर विदेशी चलन मिळत असते. फळफळावळे जरी भरपूर होत असतील, तरी अन्नधान्यासाठी या देशाला अन्य देशावरच अवलंबून राहावे लागते.
जगातील सर्व प्रकारच्या बड्या लोकांना स्वित्झरलॅंडच्या बॅंकेत पैसे ठेवण्यास आकर्षण असण्याचे काय कारण? अन्य देशातही मोठमोठ्या बॅंका आहेत, पण तेथे जगातील बडे लोक पैसे न ठेवता याच देशाच्या बॅंकेत पैसे का ठेवतात, हा एक लाखमोलाचा प्रश्न आहे. स्विसफ्रॅंक हे येथील चलन आहे.
या देशातील बॅंकिंग ऍक्टमध्ये एक विशेष तरतूद अशी आहे की, कोणत्या व्यक्तीचे येथे खाते आहे हे बॅंकेशिवाय कुणालाच कळत नाही. खातेदाराला कोड वर्ड दिला जातो व त्या कोड वर्डच्या माध्यमानेच खाते चालविले जाते. तसेच अन्य कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या खात्याची माहिती दिली जात नाही. अशा प्रकारची तरतूद आमच्या इकडच्या बॅंकिंग ऍक्टमध्येही आहे. त्यामुळे याच देशाचे आकर्षण एवढे का? याचे उत्तर असे आहे की, भारतातील सरकारी खात्याने बॅंकेला एखादी माहिती विचारली तर ती बॅंक त्या खात्याला माहिती देते किंवा बॅंकेला ते अनिवार्य आहे. येथील बॅंकेत असे होत नाही. एखाद्या व्यक्तीने चोरी करून काही पैसे आणले व ते या बॅंकेत ठेवले व विशिष्ट पुरावा म्हणून अशा खात्याचे बॅलेन्सबाबत माहिती हवी असल्यासच बॅंक त्याबाबत माहिती देते.
म्हणजेच खात्याबाबत अतिशय प्रभावी अशी गुप्तता येथील बॅंकिंग व्यवस्थेत आहे. म्हणूनच जगभराचे बडे लोक या देशातील बॅंकेत पैसे ठेवतात. अर्थात हा सर्व पैसा काळा पैसा असतो व आपल्या देशात कुठे ठेवतो म्हटले तर लगेच ते अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ शकेल. असा हा प्रचंड पैसा स्विसमधून निघून आपापल्या देशात गेला तर जागतिक अर्थव्यवस्थेला प्रचंड चालना मिळेल. अन्य देशांपेक्षा भारतीयांचा सगळ्यात जास्त पैसा या बॅंकेत आहे. म्हणून गरिबी हटविण्यासाठी हा पैसा भारतात आणण्याचे राष्ट्रीय कार्य सर्वच भारतीयांनी करावे व त्यासाठी गरज वाटल्यास अभय योजनाही आणावी असे वाटते.
प्रा.डॉ. विलास सावजी
ऍडव्होकेट व कर सल्लागार
खामगाव मो. 9422181112
Sunday, May 3, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment