राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पत्रकार पुरस्कारांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
यावर्षी स्व. बापूराव लेले स्मृती पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार दु. गु. लक्ष्मण, संपादक, होसा दिगंत - बंगळूरू/मंगलोर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच स्व. दादासाहेब आपटे छायाचित्र पुरस्कारासाठी छायाचित्रकार प्रकाश जाधव, पुणे - बिझीनेस इंडिया यांची तर स्व. शांताबाई परांजपे महिला पुरस्कारासाठी मंजिरी चतुर्वेदी-वानखेडे, दै. नवभारत टाईम्स यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कारांची निवड करण्यासाठी प्रथेप्रमाणे तीन तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली होती. देशभरातून आलेल्या एकूण सुमारे 20 प्रस्तावांमधून समितीने सर्वमतांनी यावर्षीच्या पुरस्कर्त्यांची निवड केली आहे.
न्यासातर्फे गेल्या 6 वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत विविध गावी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावर्षी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सहयोगाने हा कार्यक्रम 8 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे होणार आहे. राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासातर्फे पत्रकार प्रशिक्षण, प्रबोधनाचे विविध उपक्रम देशाच्या विविध भागात आयोजित करण्यात येतात. पत्रकारितेबाबतची विविध प्रकाशने तसेच पत्रकार साह्यार्थ वेगवेगळ्या प्रकारची योजना करण्याचा न्यासाचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत चार रूग्ण पत्रकारांना यथाशक्ती आर्थिक अनुदान देण्यातही आले आहे.
आपला स्नेहांकित,
अरुण करमरकर
9321259949
Friday, July 17, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment