आपले या ब्लॉगवर मन: पूर्वक स्वागत आहे. आज प्रसारमाध्यमे केवळ व्यावसायिक बनली आहेत; आणि पत्रकारही. परिणामी या राष्ट्रासमोरील समस्या यथार्थपणे समाजासमोर आणल्या जात नाहीत.
भारतीय समाज हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणानंतरही टिकून राहिला याला कारण आहे या देशाचा जीवनप्रवाह अर्थात हिंदुत्व.
स्वामी विवेकानंद म्हणतात,"हिन्दुत्व या देशाचा आत्मा आहे. प्राण आहे.' हिंदुत्वाची जीवनधारा ज्या भागात कमकुवत झाली तो भाग या भारतवर्षापासून तुटला, हे एक कटु सत्य आहे.
विख्यात जागतिक इतिहासकार अर्नाल्ड तोयान्बी म्हणतात, ""जीवनात आव्हानांचे खूप महत्व असते. जीवनात आव्हाने नसतील तर मनुष्य निष्क्रीय बनत जातो आणि शेवटी तो नष्ट होतो. व्यक्तीच्या जीवनात आव्हाने असतील तर पुढील दोन पैकी एक गोष्ट होऊ शकते... 1. आव्हाने समजून घेतली नाहीत तर त्या आव्हानांना बळी पडून नष्ट व्हावे लागते. किंवा 2. आव्हाने समजून घेऊन त्यांना प्रतिसाद दिला तर त्यातून मनुष्याचा विकास होतो.'' जी गोष्ट मनुष्याला लागू पडते तीच समाजाला आणि राष्ट्रालाही लागू पड़ते.या राष्ट्राची जीवनधारा खंडीत करण्याचे प्रयत्न परकीय आणि भोगवादी विचारांवर पोसलेल्या स्वकियांकडून मुजोरपणाने सुरु आहेत.ख्रिस्ती मिशनरी अनेक मार्गाने हिन्दू धर्माचे लचके तोडून येथील सहिष्णु जीवनप्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इस्लामी आतंक हा अतिरेकी, घुसखोरी आणि प्रचंड जननदर या माध्यमातून या राष्ट्राला ग्रासत आहे.
हिन्दुन्मधे न्यूनगंड निर्माण करण्याचे प्रयत्न तथाकथित धर्मनिरपेक्षवादी बुद्धिवादी करीत आहेत. त्यामुले या समाजासमोरील आणि राष्ट्रासमोरील आव्हनांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करीत आहे.
हा ब्लाग स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापक, वक्ते, लेखक यांना संदर्भासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच देशावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी समजून घेण्याची प्रामाणिक जिज्ञासा असणाऱ्या कोणालाही हा ब्लाग उपयुक्त ठरेल. सोलापूर तरुण भारतमध्ये प्रकाशित होणारेपॉंचजन्यचे माजी संपादक तरुण विजय, नागपूर तरुण भारतचे माजी संपादक व विचारवंत मा. गो. वैद्य, दै. केसरी व वृत्तदर्शनचे माजी संपादक अरुण रामतीर्थकर, पद्मश्री मुजफ्फर हुसैनआदी मान्यवर विचारवंतांच्या लेखांमुळे ब्लागला एक उंची प्राप्त झाली आहे. लेख ब्लागवर प्रकाशित करण्यासाठी मा. संपादक अनिल कुलकर्णी यांनी परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करणे औचित्याचे आहे.
वृत्तपत्र वाचनापेक्षा इंटरनेटशी अधिक मैत्री करणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना उपयुक्त ठरावा यासाठी या ब्लागची निर्मिती केली आहे.विविध महत्त्वाच्या विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख "ऑनलाईन' उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. या ब्लागवरील लेखांमुळे तरुणांमधील स्फुल्लींग चेतले तर ती महत्त्वाची बाब ठरेल.
ब्लागवरील लेख वाचून स्वत: काहीतरी करण्याची इच्छा झाली तर 1. आपल्या 10 परिचितांना या ब्लागची माहिती मेल करावी. 2. psiddharam@gmail.com वर आपला अभिप्राय कळवावा.
journalist.
sub-editor in marathi daily newspaper- Tarun Bharat (solapur).
editor- Vivek Vichar, marathi monthly of Vivekananda Kendra, Kanyakumari.
mobile : 9325306283
psiddharam@gmail.com
No comments:
Post a Comment